प्रदेश कार्यकारणीत खा.रक्षाताई खडसेची निवड ; नाथाभाऊ फक्त विशेष निमंत्रित सदस्य !
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र भाजपची राज्य कार्यकारणी आज जाहीर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. या कार्यकारणीत रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा.रक्षाताई खडसे यांची भाजप प्रदेश मंत्री पदी निवड करण्यात आली आहे. तर एकनाथराव खडसे यांची प्रदेश कार्यकारणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आल्याने समर्थकांमध्ये नाराजी सुर आहे.
महाराष्ट्र भाजपची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि १ कोषाध्यक्ष आहे. दरम्यान, कार्यकारणीतून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर पंकजा मुंडे यांना राज्य कार्यकरतीतून वगळण्यात आले आहे. परंतु त्यांना केंद्रात जबाबदारी देण्यात येईल असेल चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आलीय. पंकजाताई किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडेंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, केंद्रातली जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल असे चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. परंतू ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या बाबतीत त्यांनी कुठलेही वक्तव्य केलेले नाही. नाराज असलेले एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे.