रावेर पालिकेच्या निवडणुकीत महाआघाडीतील घटक स्वतंत्र; चारही जागा भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना स्वतंत्र लढणार
रावेर (प्रतिनिधी)। येत्या जानेवारीत होऊ घातलेल्या रावेर नगरपालिकेच्या नविन वसाहतीच्या चारही जागांसाठी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. यामुळे या चारही जागी अटीतटीच्या निवडणुका होतील.
राज्यातील नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या एक वर्षावर येऊन ठेपल्या असताना रावेर नगरपालिकेच्या नविन वसाहतीमध्ये येत्या जानेवारीमध्ये ४ जागांसाठी निवडून होत आहे. फक्त एक वर्षा चा नगरसेवक म्हणून होणारी ही निवडणूक अटीतटीची होणार असून राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना, व कांग्रेस याची एकत्र सत्ता असली तरी रावेर नगरपालिकेची ही निवडणूक हे सर्व पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे याच्या कडून सांगण्यात आले या मुळे भाजप ,शिवसेना ,राष्ट्रवादी, व कांग्रेस अशी चौरंगी लढत होणार एवढे नक्की ,सर्व पक्षाचा हा प्रतिष्ठेचा मुद्दा राहणार असून या चार जागा पालिकेची सेमीफायनल निवडणुक असणार असल्याने या चारही जागांकडे चौघ पक्ष नजर ठेऊन आहेत.