क्राईमरावेर

रोझोदा येथील वृद्ध दाम्पत्याच्या हत्ये प्रकरणी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी !

रोझोदा ता.रावेर(प्रतिनिधी)। येथील वृध्द पती-पत्नीची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या परेश खुशाल भारंबे या आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, परेश हा मृत भारंबे दाम्पत्याच्या शेजारीच राहिवासास आहे तो कर्जबाजारी झालेला होता. चोरीच्या उद्देशाने तो घरात शिरला होता. मात्र त्या दाम्पत्याला जाग आली. यामुळे आपल्या कृत्याचा बोभाटा होईल म्हणून त्याने धारदार शस्त्राने वृद्ध पती-पत्नीची हत्या केली. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर अवघ्या बारा तासांत पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवून रात्री उशीरा पोलिसांनी परेश खुशाल भारंबे (वय३२) याला अटक केली होती.

दरम्यान, आज परेश भारंबे याला रावेर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!