भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना, गणेशमूर्ती ऐवजी धातूच्या मूर्तीचे पूजन करावे !

मुंबई (वृत्तसंस्था)। राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे देशासह राज्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे उत्सवांच्या आनंदावर विरजण पडले आहे. नागरिकांना सण उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. (Maharashtra Government issues guidelines for celebrating Ganesh Utsav)

दरम्यान, सर्वांचा आवडता गणेशोत्सव सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या गणेशोत्साकरता राज्य सरकारने मार्गदर्शक सूचनांची घोषणा केली आहे. त्यामुळे या सणांच्या कालावधीत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.

कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

  • महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.
  • कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता. तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपा बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
  • श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी.
  • यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदि मूरतीचे पूजन करावे.
  • मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे.
  • घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.
  • उत्सवाकरिता देणगी किंवा वर्गणी स्वेच्छेने दिल्यास तिच्या स्वीकार करावा.
  • जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पहावे.
  • तसेच आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  • सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यशोचित पूर्ण परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम किंवा शिबिरे घ्यावी. यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
  • आरती, भजन, कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे आणि तरतुदींचे पालन करण्यात यावे.
  • श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट आणि फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे. तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
  • प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
  • श्रींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!