तज्ज्ञांच्या चिंतेत वाढ, लहान मुलं ही मोठ्या संख्येत कोरोनाच्या विळख्यात!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (वृत्तसंस्था)। राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना कोरोनाच्या विळख्यात प्रौढांसह लहान मुलं देखील सर्वाधित सापडत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. राज्यात १ मार्चपासून ते ४ एप्रिल दरम्यान, ६० हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये साधारण वय वर्ष ५ असणाऱ्या मुलांची संख्या ९ हजार ८०० इतकी असल्याने राज्याच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. कोरोनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात लहान मुलांची संख्या असल्याने तज्ज्ञांची देखील चिंता वाढवली आहे.
कोरोना व्हायरस देशातील मोठ्या शहरात देखील वेगाने पसरत आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग झाला असून महाराष्ट्रात बाधितांचा आकडा चिंताजनक आहे. राज्यात दररोज राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३८ लाख ९८ हजार २६२ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६० हजार ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईसारख्या धावपळीच्या गर्दीच्या शहरात गेल्या २४ तासात ७ हजार ३१८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ५८ लाख ६ हजार ६९२ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असला तरी देखील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येताना दिसत नाहीये. तर दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या अधिक वाढताना दिसत आहे. तर मिनी लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्रातील काही शहरांतून लोकं आपल्या गावी जात आहे. पुणे,मुंबई, नाशिक, नागपूर सारख्या मोठ्या शहरातून बहुतांश मजुरांनी आपल्या गावची वाट धरली आहे.