भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

पाणलोट क्षेत्रात चागला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी साठयात वाढ !

हिंगोणा. ता। यावल(प्रतिनिधी)
सातपुड्याच्या कुशीत होत असलेल्या दमदार पावसामुळे पहिल्यादांच जुनच्या पहिल्या पावसात हिंगोणा ता.यावल जवळील मोर मध्यम प्रकल्प ६३. २६ टक्के भरले आहे. तेव्हा या प्रकल्पाच्या चार गेट पैकी एक गेट तीन दिवसांपासुन ५ सेंटीमिटरने उघडण्यात आले आहे तर त्यातुन मोर नदीपात्रात दररोज ०. २४० दलघमी पाण्याच्या विर्सग होत आहे. या विर्सगामुळे शेतविहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणे अपेक्षीत आहे.


हिगोंणा ता. यावल गावाच्या पुढे सातपुड्याच्या कुशीत मोर मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाची एकुण क्षमता ९.५०५ दलघमी आहे. तर या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र हे सातपुड्यातील असुन सद्या सातपुड्याच्या कुशीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. परिणामी सदरील धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठत असुन यंदा प्रथमच जुन महिन्यात प्रकल्प हे ६३. २६ टक्के भरले आहे व सद्या ६.५८१ दलघमी जलसाठा धरणात झाला आहे त्यातचं अजुन संपुर्ण पावसाळा बाकी आहे. म्हणुन गेल्या तीन दिवसांपासुन या मोर मध्यम प्रकल्पातील चार पैकी एक गेट ५ सेंटीमिटरनेे उघडण्यात आलेे आहे व या तुन दररोज मोर नदी पात्रात ०. २४० दलघमी पाण्याचा वर्सग सुरू आहे. सदरील पाणी फैजपूर, आमोदा, अंजाळे कडून तापी नदी पात्रात येत आहे. तर या विर्सग मुळे शेत विहिरीच्या पाण्यात देखील वाढ होण्यास मदत होणार आहे.
कालव्यात पाणी सोडू.


या मध्यम प्रकल्पाला एक उजव्या कालवा आहे व या कालव्यास हिंगोणा मायनर १ व २ अशा वितरिका असुन उपवितरिका देखील आहे प्रकल्पात अजुन साठा वाढल्यास प्रसंगी कालव्यातुन देखील विर्सग करू असे अभियंता महेश पाटील यांनी सांगीतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!