भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

अपयशाने खचून न जाता यशाचा मार्ग शोधला पाहीजे हेच खरे यशाचे गमक आहे…. केद्रीय लोकसेवा आयोगाचे टॉपर अक्षय बाऱ्हे यांचे प्रतिपादन

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अपयशाने खचून न जाता यशाचा मार्ग शोधला पाहीजे हेच खरे यशाचे गमक आहे…. केद्रीय लोकसेवा आयोगाचे टॉपर अक्षय बार्हे यांचे भुसावळ येथील कृष्णचंद्र सभागृहात आयोजित सामाजिक गुणगौरव प्रसंगी प्रतिपादन आपल्या गुणगौरवाला उत्तरा दाखल पुढे बोलताना अक्षय बार्हे यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, कुटुंबातील करती स्त्री शिक्षित असेल तर त्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहत नाही महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा महत्व अधोरेखित करताना त्यात त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे असे सांगितले.


भुसावळ शहरातील कृष्णचंद्र सभागृहात सामाजिक बांधवांनी मिळून अक्षय चा केलेला गुणगौरव समाजातील नव तरुणांसोबतच पालकांसाठी देखील ऊर्जा स्त्रोत ठरणार आहे अक्षय च्या पालकांनी आपल्या मनोगतात आनंद अश्रूंना वाट मोकळी करत या संघर्ष यैध्याच्या यशस्वी जीवनाचे गमक विशद करताना पदरी अठरा विश्व दारिद्र्य असले तरी देखील प्रसंगी व्याजाने पैसे घेऊन नातेवाईकांच्या मदतीने अक्षयच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले कंडारी सारख्या ग्रामीण भागातील अक्षय ने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून 140 वा अव्वल क्रमांक पटकावत IFS वन संरक्षक पदी विभागात मोक्याच्या जागी निवड करण्यात आलेली आहे. कुठलीही कौटुंबिक आर्थिक शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अक्षय ने संपादन केलेले यश भल्या भल्या विचार करायला लावण्या साठी भाग पाडत आहे.

अक्षय आणि अक्षय चा परिवार ज्या विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन यशस्वी झाला आहे त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांकडे सर्व काही सुबत्ता असून देखील केवळ आणि केवळ आपल्या ध्येयप्रती विद्यार्थी आणि पालक हे दक्ष नसल्याने ते यशापासून कोसो दूर राहतात आयुष्यात अपयश येणं देखील यशाच्या खरा मार्गाकडे जाण्याचा सुलभ मार्ग आहे अपयशाला नकारात्मक भूमिकेतून न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून घेत आपलं लक्ष निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांनी मार्गक्रम करणे महत्त्वाचे आहे यशस्वी होताना या वाटेवर अनेक अडचणी आणि समस्या ह्या येतच राहतात आपले आदर्श परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास हाच माझ्या यशस्वी जीवनाचे मार्गदर्शक ठरला आहे त्यामुळे मी माझे यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी अर्पण करतो आणि भविष्यात माझ्या हातून उपेक्षित कष्टकरी समाजाची सेवा निश्चितच घडेल असे आश्वासन अक्षय ने दिले.


सत्कार प्रसंगी भुसावळ नगरीच्या प्रभारी नगर अध्यक्षा शैलाताई नारखेडे, लोकनेते जगन भाई सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, भीम आर्मीचे प्रमुख गणेश भाई सपकाळे,कामगार नेते शांताराम जाधव प्राध्यापक अनिल हिवराळे, लक्ष्मण वाघ, राजकिरण निकम, राजेश आव्हाड सेवानिवृत्त गार्ड यांनी अक्षयच्या जीवनावर प्रकाश झोत टाकत आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी खरात साहेब,भुसावळ न. पा. च्या महिला बालकल्याण समिती सभापती शोभाताई इंगळे,उल्हास भाऊ पगारे नगरसेविका शांतबाई सुरवाडे ताई, सातदिवे ताई, काजल बाळा मोरे ताई, पूजा ताई तायडे यांच्या समवेत सुरेश भाऊ यशोदे,डॉ. वसंतराव झारखंडे, इगल स्पोर्ट चे सुरेश महाजन संजय भटकर, कंडारी च्या मा. सरपंच योगिता शिंगारे, डॉ. सूर्यभान पाटील, प्रविण मोरे, ऑ.फ. चे नितीश तायडे, राहुल भाऊ घोडेस्वार, बाळाभाऊ मोरे यांचीं प्रमुख उपस्थिती होती


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेल्वे एससी एसटी असोसिएशन चे मंडल अध्यक्ष वाल्मीक जी देहाडे यांनी केली तर आभार प्रदर्शन बी. टी. तायडे यांनी केले यावेळी समाजातील बहुसंख्य बंधू-भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती समाजातील विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी पत्रकार मित्र यांचे सह अनेकांनी अक्षयचा सत्कार करत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आभार व्यक्त करत अक्षयला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष लोखंडे, कामगार नेते सुधीर भाई जंजाळे, बबलू नेतकर, संगीत खरे , आनंद हुसळे, पत्रकार राजेश तायडे, विशाल खेडकर, संदीप शिंगारे तसेच बौद्ध समाज गुणवंत समितीचे सर्व सदस्य तसेच ऑल इंडिया एससी/ एसटी रेल्वे एम्प्लॉईस असोसिएशन च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आणि समाज बांधवांचे सहकार्य लाभले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!