यावल तालुक्यातील ४७ ग्राम ग्रामपंचायतींचे वॉर्ड निहाय आरक्षण कार्यक्रम जाहीर
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील मुदत संपलेल्या ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून वॉर्ड निहाय सदस्यांचे आरक्षण काढण्याचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून १२ जुन रोजी त्या-त्या ग्रामपंचायतीत विशेष सभा बोलावून प्रारूप आरक्षण काढण्यात येईल व त्यावर २५ जुनपर्यंत हरकती व करीता मुदत दिली जाणार आहे. अंतिम वॉर्डनिहाय आरक्षण हे १० जुलै रोजी प्रसिध्दी दिली जाणार आहे व त्यानंतर सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर होणार आहे.
या ग्रामपंचायतीत निघणार सदस्यांचे आरक्षण व तेथील आरक्षीत सरपंच पद –
अनुसुचित जमाती राखीव– वड्री खुर्द, कोसगाव, सांगवी खुर्द, पिळोदे खुर्द, हंबर्डी, राजोरे.
अनुसुचित जामाती महिला राखीव– कोरपावली, कासवे, शिरसाड, मनवेल, मारूळ, बामणोद, विरोदे, बोरावल खुर्द,
अनुसूचित जाती राखीव– किनगाव बुद्रुक, मोहराळे, डांभुर्णी, निमगाव
अनुसुचित जाती महिला राखीव– वनोली, दुसखेडे, अंजाळे.
नामाप्र– भालशीव, हिंगोणे, आमोदे, सातोद, विरावली, नायगाव
नामाप्र महिला राखीव– दहिगाव, भालोद, पिंप्री, उंटावद, वढोदे प्र. सावदा, कोळवद, महेलखेडी
सर्वसाधारण- चिंचोली, बोरखेडा बुद्रुक, सावखेडेसीम, पिंपरूड, टाकरखेदे
सर्वसाधारण महिला राखीव – अट्रावल, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक, डोणगाव, नावरे, वढोदे प्र.यावल, बोरावल बुद्रुक, आडगाव
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
