आ. एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुक्ताईनगर येथे १ हजार विद्यार्थ्यांची भव्य ‘मानवी साखळी’
संस्थेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे व सौ. शारदाताई खडसे चौधरी यांची उपस्थिती; विद्यार्थ्यांचे केले कौतुक.
१०० शिक्षक-शिक्षिकांचाही सक्रिय सहभाग; आकर्षक शिस्तबद्धता ठरली परिसरात चर्चेचा विषय
मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५ व्या वाढदिवस अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात तब्बल १००० विद्यार्थी आणि १०० शिक्षक-शिक्षिका यांनी एकत्र येत एक भव्य ‘मानवी साखळी’ साकारली.अत्यंत देखण्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने साकारण्यात आलेली ही मानवी साखळी संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यात आणि शैक्षणिक वर्तुळात प्रचंड कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरली आहे.
नाथाभाऊंनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या आणि विशेषतः शिक्षण क्षेत्राच्या विकासात दिलेले योगदान अद्वितीय आहे. याच कृतज्ञतेपोटी विद्यालयाच्या वतीने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी विद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक अत्यंत उत्साहाने एकत्र आले. त्यांनी
J E SCHOOL,नाथाभाऊ @75
अशा रचनेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षिका बसून सामूहिक कवायती करीत ही भव्य मानवी साखळी तयार केली.प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे तसेच सौ. शारदाताई खडसे चौधरी यांची मैदानावर आवर्जून उपस्थिती होती. या भव्य मानवी साखळीचे विहंगम दृश्य पाहून त्यांनी विद्यालयाचे कौतुक केले. या वेळी बोलताना ॲड. रोहिणी खडसे यांनी, विद्यार्थ्यांमधील ही शिस्त आणि प्रेम पाहून मन भारावून गेल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्राप्रती नाथाभाऊंनी दाखवलेल्या आस्थेला विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दिलेल्या या अनोख्या मानवंदनेबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली.
या मानवी साखळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नाथाभाऊंना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने शुभेच्छा दिल्या. मैदानावर उपस्थित १००० विद्यार्थ्यांचा उत्साह, त्यांच्या सामूहिक कवायती आणि शिस्त यामुळे संपूर्ण परिसराला एका महोत्सवाचे स्वरूप आले होते. नाथाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिक्षण क्षेत्राकडून देण्यात आलेली ही आजवरची सर्वात मोठी आणि अनोखी मानवंदना ठरली आहे.या अशा भव्यदिव्य उपक्रमाच्या यशस्वीते साठी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी, क्रीडा व कला शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा शिक्षक यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मैदानावर विद्यार्थ्यांची रचना आणि शिस्त सांभाळण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. हा भव्य सोहळा पाहण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पालकांनीही विद्यालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.


