भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | नायगाव तापी नदीवरील इलेक्ट्रिक मोटारीचा करंट लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका विरुद्ध भादवि कलम ( 304 अ )प्रमाणे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शामराव रामा मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा भाचा नामे विजय उर्फ सोनू मराठे हा घरी त्याच्या मोठ्या भावाला मोटर चालू करून येतो असे सांगून गेला परंतु दुपारपर्यंत परत न आल्यामुळे मयताचा मोठा भाऊ याने नदी किनारी जाऊन बघितले असता सोनू हा मोटारी चा शॉक लागून पडलेला दिसला तत्काळ त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे गावातील काही नागरिक तसेच पोलीस पाटील सरपंच यांनी नदीवर धाव घेतली तसेच पोलिसांना सुद्धा दूरध्वनीवरून संपर्क करून बोलवण्यात आले

त्या ठिकाणी बसवलेली मोटर ही रवींद्र भास्कर पोहेकर यांच्या मालकीची आहे असे प्रत्यक्ष दर्शी गावकऱ्यांनी सांगितले आणि या मोटारीमध्ये करंट असल्याचे त्यांना माहिती दिलेली होती असे सुद्धा सांगण्यात आले परंतु त्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे आज तरुणाला जीव गमवावा लागला रवींद्र भास्कर पोहेकर यांच्या विरोधात माहित असून सुद्धा हलगर्जीपणा केल्यामुळे भादवि कलम (304 अ )प्रमाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!