खिर्डी ते बलवाडी “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता” रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेना.
खिर्डी ता,रावेर (प्रतिनिधी)। खिर्डी ते बालवाडी हा रस्ता रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हेच समजेनासे झाले आहे ,या जीवघेण्या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, खिर्डी ते बलवाडी हा अवघा पाच किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडल्याने अक्षरशः या रस्त्या वरून पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे. या रस्त्यावर लाखो रुपये खर्च होवूनही रस्त्याची अवस्था मात्र जैसे थे च आहे. या रस्त्यावर खड्ड्यांनी थैमान घातले असून रहदारीचा प्रश्न मात्र चांगलाच ऐरणीवर आला आहे.त्यातच रस्त्याच्या कडेला साईड पट्ट्या खोदून ठेवल्याने समोरून येणार्या वाहनास पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागतो. अपघातांच्या प्रमानात वाढ हो त असल्याने वाहन धारक शेतकरी व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अक्षरशः चाळण झालेल्या रस्त्यावरुन नागमोडी वळण घेत संथ गतीने वाहतूक करणे भाग पडत असल्याने अनेक वाहन चालकांना पाठ दुखी व कंबर दुखीचे सारखे आजार जडलेले आहे. ज्या रस्त्याला पार करण्यास दहा ते पंधरा मिनिटे वेळ लागत होता. तोच रस्ता पार करण्यास अर्धा तास लागतो. त्यातच दुचाकी,चारचाकी,इ. वाहनांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे.
रस्त्यावर पडलेल्या सतराशे साठ खड्ड्यां न मधून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच खड्डे चुकवितांना मोटर सायकल स्लीप होवून वारंवार अपघात होत असल्याने खड्या मुळे रस्त्यावर एखादी व्यक्ती दगावल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे.लांब पल्ल्याच्या गाड्या याच रस्त्याने ये – जा करत असल्याने गाड्यांची ही खिळखिळी अवस्था झाल्याचे पहावयास मिळत आहे. सदरील रस्त्याचे नव्याने काम होणे गरजेचे आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागास मुहूर्त कधी मिळतो.असा संताप जनक प्रश्न वाहन चालकांना पडला आहे.