सावदा नगर पालिकेत बायोमेट्रिक हजेरी मशिन गेली का चोरीला…? काही कर्मचार्यांचे ‘आव-जाव घर तुम्हारा’,
सावदा, मंडे टू मंडे न्युज चमू | सावदा नगर पालिका कार्यालयातील कर्मचारी उपस्थिती व्यवस्थेबाबत गंभीर त्रुटी समोर येत असून बायोमेट्रिक प्रणाली मशिन पालिकेत लावण्यात आली होती परंतु कित्तेक महिन्यंपासून अचानक अदृश झाल्याने गेली कुठ ? मशिन चोरीला तर गेली नाही ना ? की अदृश्य झाली ? अशा शंका तथा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याची बाब उघड झाली असुन काही कर्मचारी आपली मनमानी करत असल्याची ओरड होत असुन गेल्या ५ दिवसांच्या कालावधीत बांधकाम विभागात शहरातील नागरिक गेल्या एक दीड महिन्यापासून काम होत नसून अपंग व्यक्तीनाही फेऱ्या मारव्या लागल्या असल्याचा रोष व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे ‘बायोमेट्रिक हजेरी नाही पालिकेला अन् पगार लेटकमिंगला’, अशी अवस्था आहे. त्यामुळे काही कर्मचारी ‘आव-जाव घर तुम्हारा’, असे वर्तन करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
पालिकेत कर्मचारी उपस्थिती नोंदवण्यासाठी बसविण्यात आलेली बायोमेट्रिक प्रणाली सध्या कार्यरत नसल्याने हजेरी ही हाताने, हालचाल रजिस्टरच्या माध्यमातून घेतली जात आहे. या पद्धतीत पारदर्शकतेचा अभाव असल्यामुळे अनेक वेळा कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असतानाही त्यांच्या उपस्थितीची नोंद होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ असताना मात्र काही कर्मचारी ११ वाजेला, साडे ११ वाजेला येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत असून त्यातही जेवणाची वेळ १ ते २ असताना दुपार नंतर नगरपालिकेत सन्नाटा पाहायला मिळत असून ठराविक कर्तव्यदश कर्मचारी वगळता बाकी विभागातील कर्मचारी दुपार नंतर येन तेन कामाच्या बहाण्याने जात असल्याचे सांगून घरी निघून जात असल्याची गंभीर वास्तव आहे.
विशेष म्हणजे काही कर्मचारी व अधिकारी कामाच्या वेळेत मध्येच कार्यालयातून निघून जात असल्याच्या तसेच वेळ संपण्यापूर्वीच गैरहजर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. परिणामी, नागरिकांची दैनंदिन कामे वेळेत पूर्ण होत नसून पालिकेच्या सेवा व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. विशेष बाब म्हणजे, बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यासाठी पालिकेने हजारो रुपये खर्च केले होते. मात्र सध्या संबंधित मशीन कार्यालयात उपलब्ध नसल्याने ते नेमके गेले कुठे? तसेच ते कार्यान्वित का करण्यात आले नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून रोष व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे पालिकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही बाब पालिका लोकप्रतिनिधींच्या लक्षात न येणे ही आश्चर्याची गोष्ट आहे. नागरिकांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच बायोमेट्रिक प्रणाली तात्काळ सुरू करून कर्मचारी उपस्थितीवर कडक नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पालिका प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

