विरोदा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती साजरी
विरोदा, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | विरोदा येथे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. तसेच, सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

संध्याकाळी एका आकर्षक सजावट केलेल्या वाहनातून सरदार पटेल यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बँड च्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शरद भाऊ महाजन,भाजपा फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश भाऊ बेंडाळे, उपसरपंच विनोद झाल्टे,ग्राम पंचायत सदस्य पंकज बऱ्हाटे,सतीश बऱ्हाटे,नितीन चौधरी,कमलाकर चौधरी,जितेंद्र खाचणे, रवींद्र खाचणे,गिरीश राणे,अमोल वारके, चेतन राणे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. व सर्व उपस्थित मान्यवरांचे लेवा समिती, तर्फे सतिश बऱ्हाटे यांनी आभार व्यक्त केले
