बलवाडी-निंभोरा निकृष्ठ दर्जाचे रस्ता काम ग्रामस्थांनी पाडले बंद
बलवाड़ी, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | बलवाडी निंभोरा जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.

सदरच्या चार किलोमीटर रस्त्याची खुप दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात या रस्त्याने वाहने चालवणे मुश्किल होते. हे रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने येथून निंभोरा स्टेशनला माल वाहतुक,शालेय विद्यार्थी व प्रवाशांची सतत वर्दळ असते.तसेच या रस्त्याचे काम न खोदता व डांबर न टाकता साईड पट्टया न करता फक्त खडी पसरवून निकृष्ठ दर्जाची खळी वापरून काम सुरु केल्याने बलवाडी ग्रामस्थांनी तातडीने बंद पाडले.ग्रामस्थांनी या कामाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

