Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यभुसावळ

एक्स्प्रेस मधून प्रवास करणाऱ्या ३५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा ; भुसावळ रेल्वे स्थानकावर वैद्यकीय उपचार

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज | केरळकडे जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समूहातील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी समोर आली. इटारसी रेल्वे स्थानकाजवळ विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्याने रेल्वे प्रशासनाची यंत्रणा तत्काळ अलर्ट झाली.

केरळमधील साधारण ८ ते १८ वयोगटातील सुमारे ८३ विद्यार्थ्यांचा समूह मंगला एक्स्प्रेसने प्रवास करीत होता. यातील २५ ते ३० विद्यार्थ्यांनी इटारसी स्थानक येण्यापूर्वी जेवण केले होते. त्यानंतर काही वेळातच सुमारे ३५ विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला.

घटनेची माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच वैद्यकीय यंत्रणा सक्रिय करण्यात आली. खंडवा रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथक पाठवून विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर खंडवा ते भुसावळ दरम्यान धावत्या मंगला एक्स्प्रेसमध्येही वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक उपचार केले.

दरम्यान, मंगला एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहोचताच पुन्हा वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली. आवश्यक उपचार केल्यानंतर विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली. या प्रक्रियेसाठी गाडी भुसावळ स्थानकावर सुमारे तासभर थांबून होती. विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. या घटनेमुळे काही काळ रेल्वे प्रशासनातही खळबळ उडाली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!