भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळरावेर

लिंगायत कोष्टी समाजाचा भुसावळ येथे ६ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | लिंगायत कोष्टी समाज सेवा मंडळ, भुसावळ यांच्यातर्फे समाज बांधवांसाठी ६ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दिनांक २६ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी १०ते दुपारी ४या वेळेत लोणारी समाज मंगल कार्यालय,अहिल्याबाई होळकर चौक, जळगांव रोड,भुसावळ येथे पार पडणार आहे.

भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे विवाह.या पार्श्वभूमीवर समाजातील तरुण-तरुणींसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा परिचय मेळावा घेतला जात आहे.समाजातील प्रत्येक घटकाने या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून राजेश सुरेश कोष्टी, प्राध्यापक, डॉ.अण्णासाहेब बेंडाळे कनिष्ठ महिला महाविद्यालय,जळगांव हे मार्गदर्शन करणार असून, उद्घाटक म्हणून युवराज दगडू लोणारी,माजी प्रभारी नगराध्यक्ष,भुसावळ उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रीता मेत्रेवार कडे (अतिरिक्त जिल्हाधिकारी, जालना) सौ. नंदा कोंगे (मुख्याध्यापिका, भिवंडी)डॉ. निलेश घोडके (पशुधन पर्यवेक्षक, कोल्हापूर)अरुण सोनोने (डेप्युटी मॅनेजर, स्टेट बँक, इंदौर)यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सौ.संध्या कोंगे (निर्मल हॉस्पिटल, सुरत)सौ.शारदा कोष्टी (टॅटू आर्टिस्ट, पुणे) प्रविण उमराणे (संचालक, लिंगायत हडगर कोष्टी संस्था, अंबाजोगाई)
रविंद्र येलगिरे (अध्यक्ष, देऊळगाव राजा व उपाध्यक्ष, बुलडाणा जिल्हा संघटना) हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.दुपारी १२ते १.३० या वेळेत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.


नोंदणी: ऑनलाईन नोंदणी २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे. तसेच, मेळाव्याच्या दिवशी सकाळी ०९:०० पासून प्रत्यक्ष नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे.
या मेळाव्याच्या आयोजनामागे मुकेश एकनाथ कोष्टी (अध्यक्ष) आणि समस्त पदाधिकारी व सदस्य,लिंगायत कोष्टी समाज सेवा मंडळ,भुसावळ यांचे परिश्रम असून, अधिकाधिक समाजबांधवांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या उपवर मुला-मुलींसाठी योग्य जोडिदार निवडण्याची संधी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!