भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

जळगाव-भुसावळमार्गे आणखी दोन रेल्वे गाड्या धावणार

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दिवाळी व इतर सणासुदी निमित्ताने रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं जळगाव-भुसावळमार्गे आणखी दोन रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उधना-भागलपूर-उधना आणि मालदा-उधना-मालदा या दोन गाड्या सुरु होणार आहे. विशेष या गाड्यांमुळे jalgaon जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला.


०९०८१ उधना-भागलपूर अनारक्षित विशेष रेल्वे २७ ऑक्टोबरपर्यंत घावणार आहे. ही रेल्वे दररोज सकाळी ११:१५ वाजता उघना येथून निघेल आणि दुपारी ३.५५ वाजता जळगावात थांबा घेऊन भागलपूरसाठी रवाना होईल. त्याच वेळी, ०९०८२ भागलपूर-उधना अनारक्षित विशेष रेल्वे २८ ऑक्टोबरपर्यंत रोज सकाळी १०. ५० वाजता भागलपूरहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उधना येथे पोहोचेल.

०३४१७ मालदा उघना विशेष ही मालदा येथून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५५ वाजता भुसावळात थांबा घेईल. २५ ऑक्टोबर तसेच १ आणि ८ नोव्हेंबर रोजी धावणार आहे. तर ०३४१८ उधना-मालदा विशेष गाडी सोमवारी उधना येथून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५५ वाजता भुसावळात थांबा घेईल. ही रेल्वे २१ आणि २८ ऑक्टोबर, ४ व ११ नोव्हेंबर रोजी धावणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!