भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : डिसेंबर मध्ये नगरपालिका निवडणुका?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुका होणार असून त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. त्यातही राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा त्रिस्तरीय निवडणुका घेण्याची तयारी केली आहे. या संदर्भात राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाबरोबर निवडणूक आयोगाने तयारीचा आढावा घेतला आहे.

निवडणूक आयोगाने सूचित केले आहे की, पहिल्या टप्प्यात राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. या निवडणुका नोव्हेंबर अखेर घेण्याची योजना होती. परंतु त्या बहुधा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील.

जिल्हापरिषद,पंचायत समिती

राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायतींच्या निवडणुका डिसेंबर अखेरीस होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. अखेरच्या टप्प्यात १५ ते २० जानेवारी दरम्यान २९ महापालिकांच्या निवडणुका होतील. जानेवारीअखेर सर्व निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यानुसार २० जानेवारीपूर्वी सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.

का रखडल्या निवडणुका?

यातील बहुतांश महापालिकांची मुदत 2022 मध्ये संपली. मात्र, कोरोनामुळे निवडणुका घेता आल्या नाहीत. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं वाढीव प्रभाग रचना जाहीर केली, त्याला भाजपानं न्यायालयात आव्हान दिलं. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला. महायुती सरकारनं जुनी प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला महाविकास आघाडीनं आव्हान दिलं. त्यानंतर ओबीसांच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता. आता हे सगळे विषय मार्गी लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!