भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

१० वर्षांची चिमुकली जिवानिशी गेली, अन् बडे पोलिस अधिकारी पत्रकार परिषदेत “फिदीफिदी” हसले!

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |तामिळनाडूत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे, एका १० वर्षीय चिमुकलीची हत्या करण्यात आली. या निर्घृण हत्या प्रकरणानंतर राज्यभरातच नव्हे तर देशभरात संतापाची लाट पसरली. आणि खाकी वर्दीतल्या संवेदना मात्र पूर्णपणे गोठल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. अर्थात सर्वच अधिकारी असे आहेत असे नाही. काही अपवाद आहेच.

असे असताना एका १० वर्षांच्या चिमुकलीची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण राज्य संतापाने धुमसतंय, रस्ते आंदोलनांनी पेटलेत आणि नव्या टीव्हीके सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. पण ज्या पोलिसांवर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी आहे, तेच पोलीस अधिकारी पत्रकार परिषदेत अत्यंत लाजीरवाण्या पद्धतीने हसताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ‘एक १० वर्षांची पोरगी जिवानिशी गेली; आणि पोलिसांचे बडे अधिकारी तिथे फिदीफिदी हसले’, हा संतापजनक प्रकार पाहून आज माणुसकीलाही लाज वाटली असेल. जनतेच्या मनात तीव्र आक्रोश असताना, या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पोलिसांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.

व्यासपीठावर एक महिला पोलीस अधिकारी आणि दोन पुरुष अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण राज्य ज्या घटनेमुळे हळहळतंय, त्या गंभीर विषयावर बोलताना या तिन्ही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू सरकायला तयार नव्हतं. माध्यमांनी जेव्हा तिखट प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा उत्तरं देण्याऐवजी हे अधिकारी एकमेकांकडे बघून वारंवार फिदीफिदी हसत होते.

दहा वर्षांची मुलगी घराबाहेर खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर तिचं शव एका तलावाजवळ सापडलं. या गुन्ह्याची आणि तपासाची माहिती देण्यासाठी तीन पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला एक महिला अधिकारी आणि वेस्ट झोनचे आयजी उपस्थित होते. प्रकरण अतिशय संवेदनशील असताना तिन्ही अधिकारी माध्यमांशी संवाद साधताना अनेकदा फिदीफिदी हसताना दिसले. याबद्दल त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.


एका निष्पाप बालिकेवर झालेल्या अत्याचारावर आणि तिच्या हत्येवर बोलताना इतकं अमानुष आणि असंवेदनशील वर्तन कसं असू शकतं? ज्या कुटुंबाने आपली पोटची पोर गमावली, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे. ही पत्रकार परिषद म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आणि पोलिसांच्या निगरगट्ट मानसिकतेचे दर्शन घडवणारी ठरली आहे.
जर राज्याचे रक्षकच इतके निर्दयी आणि असंवेदनशील असतील, तर जनतेने न्याय कोणाकडे मागायचा?” देशभरातून आता या हसणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!