स्पीड ब्रेकरवरून दुचाकी घसरली, तरुणाचा खाली पडून जागीच मृत्य
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रावेर तालुक्यातील वाघोड जवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवरून दुचाकी घसरली त्यात मनीष मनोहर सोलंकी (वय २४, रा. दुगवाडा, ता. जी. खंडवा) या तरुणाचा खाली पडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल संध्याकाळी घडली. हा तरुण सावदा येथे कामासाठी जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दि.११ जुलै रोजी संध्याकाळी मनीष सोलंकी हे आपल्या दुचाकीने बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गावरून सावदा च्या दिशेने जात असताना रावेर तालुक्यातील वाघोड जवळ अचानक समोर आलेल्या स्पीड ब्रेकरवरून त्याची गाडी घसरून तो रस्त्यावर आदळून पडला. आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
मनीष मनोहर सोलंकी (वय २४, रा. दुगवाडा, ता. जी. खंडवा) या युवकाच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अयोग्य स्पीड ब्रेकर आणि यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

