भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावपाचोरा

अल्पवयीन मुलाला विवस्त्र करून त्याचे अश्लील व्हिडीओ काढून केले व्हायरल

पाचोरा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पाचोरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलाला ९ जुलै रोजी दोघांनी विवस्त्र करून त्याचे अश्लील व्हिडीओ काढून ते व्हायरल केल्याप्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरून पंकज पाटील व दिला भोई (दोघे रा. कुरंगी. ता. पाचोरा) या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अल्पवयीन मुलगा गिरणा नदी काठावर वाळूच्या ट्रॅक्टरवर काम करत होता. त्यावेळी पंकज पाटील आणि दिला भोई यांचे भांडण सुरू झाले. मुलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु उलट त्यास पंकज पाटील याने खाली बसवून त्याचे कपडे काढले. त्यास जबरीने विवस्त्र करीत छेडछाड व मारहाण करत त्याचे नग्नावस्थेत व्हिडीओ काढून मोबाइलवर व्हायरल केले.

या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने पीडित अल्वयीम मुलाने पाचोरा पोलिसात फिर्याद दिल्यावरून पंकज पाटील व दिला भोई (दोघे रा. कुरंगी) यांच्याविरुद्ध पॉक्सो व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!