भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | प्रवाशांची गर्दी लक्ष्यात घेता रेल्वे प्रशासनाने भुसावळ जळगाव मार्गे काही विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली. रिवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीच्या सेवेचा कालावधी वाढवला आहे.

गाडी क्रमांक ०२१८७ रिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडीची सेवा आता ३ जुलैपर्यंत होती. ती आता २५ सप्टेबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-रिवा साप्ताहिक या विशेष गाडीची सेवा आता ४ जुलैपर्यंत होती. ती आता २६ सप्टेबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यात रेल्वे गाडीच्या वेळापत्रकात व थांब्यामध्ये काहीही बदल करण्यात आलेला नसून सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, गदरवाडा, पिपरीया इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ, मनमाड, नाशिक, कल्याण आणि दादर या स्थानकांचा समावेश असून या स्थानकाचा थांबा असणार आहे. यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!