मद्यप्रेमींना झटका ! राज्यात मद्याचे दर वाढणार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील मद्यप्रेमींच. टेन्शन वाढविणारी बातमी आहे. ज्या मुले मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे. राज्य सरकाने मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तिजोरील या निर्णयामुळे १४ हजार कोटीच्या महसूलाची वाढ होणार आहे.
शासनाचा महसूल वाढवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील शुल्क वाढविले आहे. यामध्ये भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर ( IMFL) दीड टक्याने वाढ करण्यात आली आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत झालेल्या प्रमूख निर्णयामध्ये हा एक निर्णय घेण्यात आला आहे.
आता यापुढे १८० मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमतीत प्रत्येक ब्रँडनुसार वेगळी होणार आहे. यामध्ये देशी मद्य- 80 रुपये होणार आहे तर महाराष्ट्रात तयार होणारे लिकर – १४८ रुपये, तसेच भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – २०५ रुपये, विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड- ३६० रुपये अशी किमान विक्री किंमत राहणार आहे. यामध्ये प्रत्येक ब्रँडनुसार किंमतीमध्ये फरक पडणार आहे.त्यामुळे आता मद्यप्रेमींनी मद्य विकत घेताना अधिकचे पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.
त्याच प्रमाणे दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारून मद्याच्या किंमती बरोबर उत्पादन वाढवण्यासाठी सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तसेच विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात १२२३ पद नव्याने भरण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासह राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.