भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

दिवाणी न्यायाधीश पदाला गवसणी घालत जळगांव जिल्ह्यातील मस्कावद येथील ॲड.प्रियंका सपकाळे यांची गरुडझेप !!

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील मस्कावद येथील रहिवासी ॲड. प्रियंका अशोक सपकाळे यांची दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग या पदी निवड झाली असून ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावातील ॲड. प्रियांका हिची न्यायाधीश म्हणून निवड झाल्याने त्यांचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.

महाराष्ट्र भरातून केवळ ४० जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती, त्या परीक्षेत ॲड. प्रियंका यांनी न्यायाधीश होण्याचा मान मिळवला. त्या मुळगांव मस्कावद. ता. रावेर. जि. जळगाव. येथील माजी लेखापरीक्षक कै.अशोक आनंदा सपकाळे यांच्या कन्या आहेत, तसेच वसतिगृह निरीक्षक श्री. धनंजय सपकाळे व मस्कावद येथील उपसरपंच तुषार सपकाळे यांच्या भगिनी आहेत. त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीने त्यांचे रावेर तालुक्यासह संपूर्ण जळगांव जिल्ह्यातून कौतुक केले जात असून तसेच प्रविण वारके.सर यांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

    बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
    शेअर करा...
    error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!