भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | आज रविवार १२ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ पावणे नऊ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरामध्ये शासकीय विश्राम गृह परिसरामध्ये वाघ आल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. परंतु प्रत्यक्ष तो वाघ नसून बिबट्या असल्याचे दिसून आले. सकाळी साडेआठ वाजे च्या सुमारास आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी व काही कार्यकर्त्यांना रेस्ट हाऊसच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीला लागून बिबट्या दिसून आला.

तात्काळ आमदार चंद्रकांत पाटील यांनी विश्रामगृहावर धाव घेत परिस्थिती जाणून घेतली. तात्काळ आमदार पाटील यांनी वन विभागाचे अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला. घटनास्थळी व विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचे सह पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती.

येत्या दोन घंटे मध्ये बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात येईल तसेच नागरिकांनी घाबरून न जाता शक्य असेल तरच घराच्या बाहेर पडावे लहान मुलांनी घराच्या बाहेर येऊ नये . वन विभागचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून खबरदारी म्हणून बस स्थानक तात्पुरते स्वरूपात बस आगार येथे हलविण्यात आलेले असून नागरिकांनी गर्दी करू नये तसेच घाबरू नये असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!