जळगावात जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा — मान्यवर डॉक्टरांचा सत्कार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त टीम अॅफोरिझम (Chapter II) तर्फे जळगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात होमिओपॅथी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जळगाव येथील डॉ. महेंद्र काबरा, डॉ. रुपेश पाटील, डॉ. स्मिता पाटील, डॉ. संजय पाटील तसेच चिनावल येथील डॉ. रवींद्र भारंबे डॉ सूर्यकिरण वाघांण्णा यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगावच्या महापौर मा. सौ. दीपमाला काळे , गोदावरी होमिओपॅथी कॉलेजचे अध्यक्ष मा. डॉ. श्री. उल्हास पाटील, चामुंडामाता होमिओपॅथी कॉलेजचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावचे अधिष्ठाता मा. डॉ. पराग भागवत यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यातील शेकडो होमिओपॅथ डॉक्टर तसेच विविध होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह आणि ऊर्जा प्राप्त झाली.या वेळी उपस्थित मान्यवरांनी होमिओपॅथीच्या महत्वावर प्रकाश टाकत, समाजातील आरोग्यसेवेत त्याचे योगदान अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ तृप्ती बढे ह्यानी केलं आणि
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अपर्णा वाणी यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. कार्यकम यशस्वी करण्या साठी डॉ कमलेश मराठे आणि डॉ प्रणय वाणी ह्यांनी प्रयत्न केले.हा कार्यक्रम जळगावमधील होमिओपॅथी क्षेत्रासाठी एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद क्षण ठरला.
