यावल तालुक्यात तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज दि. 15 जुलै रोज मंगळवार रोजी पहाटेच्या सुमारास एक दुःखद घटना यावल तालुक्यातील दहिगाव या गावात घडली. पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाला.या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रदीप घनश्याम महाजन (वय 35, रा. दहिगाव) हा तरुण मोहराळे शिवारातील बाळू रघुनाथ पाटील यांच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. काम करत असताना तो विहिरीजवळ आला असता त्याचा घसरून तो विहिरीत पडला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. पुरुषोत्तम छगन महाजन यांनी या घटनेची माहिती यावल पोलिसांना दिली असून, यावल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

