भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

गोमांस बाळगणाऱ्यां विरोधात मोक्का…गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | विधान परिषदेत राज्यात गोमांस तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजला. आमदार श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधीद्वारे लोणावळ्यात मार्च मध्ये ५७ हजार किलो गोमांस जप्त झाल्याचा विषय सभागृहात मांडला. हे मांस दुबईत विकले जाणार होते. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी एसआयटी लावण्याची मागणी आमदार श्रीकांत भारतीय यांनी केली.

२५ मार्च रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोन संशयित कंटेनर ताब्यात घेतले होते. त्या कंटेनरमध्ये जनावरांचे मांस आढळून आले होते. दोन्ही कंटेनर मधील मांसाचे नमुने हे तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. यानंतर त्या कंटेनरमध्ये असलेले मांस हे गोमांस असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन्ही कंटेनरमध्ये मिळून तब्बल ५७ हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले होते.

दरम्यान, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर देताना या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. यानंतर असा प्रकार समोर आल्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. गोमांस संदर्भात लवकर कायदा आणण्यात येईल, असे मंत्री भोयर म्हणाले.

राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले. या प्रकरणातील दोन आरोपी अटकेत असून त्याची चौकशी एसआयटी स्थापन करणार आहे. या प्रकरणाच्या मुळाशी सरकार जाणार असून यानंतर असा प्रकार समोर आला तर मकोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचे भोयर यांनी सांगितले. याबाबत सरकार लवकरच कायदा आणणार असल्याचे ते म्हणाले. आमदार अनिल परब यांनी ५७ हजार किलो मांस पकडले जात असेल तर तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणजेच पोलिस खात्याचे हे पूर्णपणे अपयश असल्याचा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!