भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

फैजपूर मध्ये भुसावळ येथील तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपूर येथील सावदा – फैजपूर रस्त्यावरील मिल्लत नगर परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली. भुसावळ येथील मोहम्मद इस्माईल मोहम्मद आलम उर्फ शोलु या २९ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

भुसावळ येथील मोहम्मद इस्माईल मोहम्मद आलम उर्फ शोलु वय २९ वर्ष हा तरुण २९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास कामानिमित्त फैजपूर येथे मिल्लत नगर परिसरात आला असता तो चुकून रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत पडला. विहिरीत पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस घटनास्थळी दाखल होत तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व उपनिरीक्षक रशीद तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!