भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : LCB पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचेवर गुन्हा? महिलेचे लैंगिक शोषण, गोळी मारण्याची धमकी, रेकॉर्डिंग ऐकविले, आ. मंगेश चव्हाण यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज जळगाव येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी चे आयोजन करण्यात आले होते. या नियोजन समितीच्या बैठकीत एक धक्कादायक प्रकरण समोर आले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक (PI) संदीप पाटील यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप खुद्द आमदार मंगेश चव्हाण यांनी बैठकीत केला.

सदर पीडित महिलेला जर तिने तक्रार करण्याचे धाडस दाखवले, तर संदीप पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. असेहीbआ. चव्हाण यांनी सांगितले. याहून आणखी गंभीर बाब म्हणजे pi संदीप पाटील यांनी मलाही गोळी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी या बैठकीत करत सर्व उपस्थित सभासदांसमोर कॉल रेकॉर्डिंग सुद्धा सर्वांना ऐकवून दाखविले. या संपूर्ण प्रकाराने बैठकीत मोठी खळबळ उडाली.

या प्रकाराने उपस्थित प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बैठकी दरम्यान यावर सर्वानुमते निर्णय घेत एलसीबी पीआय संदीप पाटील यांना तातडीने पदावरून हटविण्याचा ठराव करण्यात आला.

या नंतर, पीडित महिलेच्या फिर्यादीच्या आधारे जळगाव MIDC पोलीस ठाण्यात संदीप पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला या घटनेची चौकशी पारदर्शक व निष्पक्ष रित्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याच बोलल जात आहे .पोलीस यंत्रणा स्वतःच आरोपीच्या भूमिकेत असल्याने जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या संदर्भात बोलताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, “एका पोलीस अधिकाऱ्याने कायद्याची धज्ज्या उडवत अशा प्रकारे महिलेला फसवणे व धमक्या देणे अत्यंत निंदनीय आहे. जर पोलीसच गुन्हेगारी वर्तन करतील तर सामान्य जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा? जिल्ह्यात कायद्याचे राज्य राहावे म्हणून या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.”

या घटनेने जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची चर्चा नागरिकांत आहे. पोलीस यंत्रणा स्वतःच आरोपीच्या भूमिकेत असल्याने जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात  असून या पुढे या प्रकरणात काय काय घडते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!