भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर मध्ये गुटखा तस्करांवर कारवाई, मुद्देमालासह ६ लाख ३४ हजारांचा गुटखा जप्त

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आरोग्यास अपायकारक वर्षात बंदी असलेल्या अवैध गुटखा साठा वाहून नेत असताना गुटखा तस्करांवर रावेर पोलिसांनी धडक कारवाई करून दोन लाख ३४ हजार रुपये किमतीचा गुटखा व गुटखा वाहून नेणारी ४ लाखांची  गाडी असा ६ लाख ३४ हजारांचा गुटखा गाडी सह जप्त करण्यात आला.यात एकाला अटक करण्यात आली असून तीन जण फरार झाले आहेत.

एमएच ०४ एचएन १७०९ क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या गाडीतून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर येथून गुटख्याचा मोठा साठा रावेर शहरात आणला जात असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली. बऱ्हाणपुर रोडवर स्वस्तिक टॉकीज जवळ छापा टाकून पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन वाहनांची तपासणी केली असता, त्यात एकूण २ लाख ३४ किमतीचा गुटखा आढळून आला. यामध्ये १८७ प्रति पाकीटप्रमाणे ३ मोठ्या गोण्या, ३३ प्रति पाकीटप्रमाणे ३ गोण्या, १९८ प्रति पाकीटप्रमाणे २ गोण्या, २२ प्रति पाकीटप्रमाणे २ गोण्या असा गुटखा होता. या गुटख्यासोबतच गुटखा वाहून नेणारी ४ लाख रुपये किमतीची गाडीही जप्त करण्यात आली. ज्यामुळे एकूण ६ लाख ३४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी शेख मुजाहिद शेख रफिक याला अटक करण्यात आली असून आसिफ अहमद जमील अहमद, कल्लू उर्फ मोहसिन शेख युनुस शेख आणि एक अनोळखी इसम हे तीन आरोपी फरार आहेत या चार आरोपींविरोधात रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!