श्री शिवाय नमःस्त्युभ्यंम् सेवाभावी गृपचा अंतरराष्ट्रीय कथा वाचक प्रदिप मिश्राजींच्या अमृत वाणीतून सन्मान
निंभोरा बुद्रुक. ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मध्यप्रदेश येथील सिहोर कुबेरेश्वर धामला गुरू पौर्णिमा निमित्त दि.०५ ते ०९ जुलै २०२५ दरम्यान सुरू असलेल्या गुरू शिवमहापुराण कथेत व्यासपीठावरून महाराष्ट्रातील मालेगावच्या सेवाभावी श्री शिवाय नमःस्त्युभ्यंम् गृप संस्थेचे कौतूक करत आभार मानले.
सविस्तर वृत्त असे की, मालेगावचे देविदास पाटील यांनी सेवाभावी वृत्ती मनात धरून श्री शिवाय नमःस्त्युभ्यंम्
गृप संस्थेची स्थापणा चार वर्षांपूर्वी केली या गृप मध्ये महाराष्ट्रासह भारताच्या कानाकोपऱ्यातून विविध राज्यांतून एक हजाराच्या वर सेवेकरी जुळलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सेवेकरी मालेगाव, नाशिक, जळगाव, बुलढाणा, संभाजी नगर अशा विविध जिल्ह्यांतील सदस्य जूळलेले आहेत व आज रोजी श्री शिवाय नमःस्त्युभ्यंम् गृप संस्थेच्या माध्यमातून विनामुल्य सेवा देत आहे.
या कथेत भोजन व्यवस्था या गृपने सांभाळली असून भोजन प्रसाद वाटप करण्याचे कार्य दोनशेच्या वर महाराष्ट्रा सह विविध राज्यांतील सदस्य करीत आहे. सेवा ही परम धर्म हे या सेवाभावी गृप संस्थेचे चे ब्रिद असून. सिहोर सह जिथे कथा असेल शक्य होईल तेवढ्या जास्त संखेने सेवाभावी श्री शिवाय नमःस्त्युभ्यंम् चे सदस्य अध्यक्ष देविदास पाटील व उपाध्यक्ष राजू सोनवणे यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली जाऊन निःशुल्क सेवा देतात. या गृपचा ड्रेस कोट असून स्व खर्चाने हे सदस्य कथेच्या ठिकाणी येजा करतात व मनसोक्त सेवा देतात. आज पर्यंत या गृप संस्थेला महाराष्ट्रासह भारताच्या कानाकोपऱ्यातून एक हजाराच्या वर सदस्य जुळलेले आहे.
गुरू पौर्णिमा निमित्त मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्वर धामला दि.०५ जुलै ते ०९ जुलै २०२५ दरम्यान गुरू शिव महापुरान कथा सूरू असून या कथेत भोजन व्यवस्था मालेगावचा श्री शिवाय नमःस्त्युभ्यंम् गृप देविदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट सेवा देत आहे. या सेवेला बघून अंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण पंडित प्रदिपजी मिश्राजींनी दुसऱ्या दिवशी च्या कथेत थेट व्यासपीठावरून देविदास पाटील व त्यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाय नमःस्त्युभ्यंम् गृप संस्थेचे कौतुक करत आभार मानले. या कौतुकाच्या थापेने सर्व सदस्य भारावून गेले.
सेवा ही परम धर्म हे ब्रिद अंगिकारून आम्ही गुरूदेवांच्या आशिर्वादाने चार वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री शिवाय नमःस्त्युभ्यंम् गृप संस्थेचा प्रत्येक सदस्य सेवा देत असून हा सन्मान प्रत्येक सदस्यांचा आहे.आम्हाला वेळोवेळी परमपूज्य गुरूदेव पंडित प्रदिपजी मिश्राजींचे मार्गदर्शन लाभत असते त्या प्रमाणे आम्ही कार्य करत असतो.
