Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

आकाशवाणी जळगावचा ५१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, खानदेशच्या सांस्कृतिक, कृषी आणि सामाजिक विकासात आकाशवाणीचे मोलाचे योगदान

जळगाव.मंडे टु मंडे न्युज | खानदेशच्या सांस्कृतिक, कृषी आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आकाशवाणी जळगावचा ५१ वा वर्धापन दिन शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी साजरा करण्यात आला.आकाशवाणी जळगावची स्थापना १६ ऑक्टोबर १९७६ रोजी झाली. गेल्या पाच दशकांपासून आकाशवाणीने खानदेशातील श्रोत्यांशी आपले अतूट नाते जपले आहे.


‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य जपत आकाशवाणी जळगावने माहिती,शिक्षण आणि मनोरंजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. खानदेशातील सांस्कृतिक परंपरा, लोककला, लोकसंगीत, साहित्य आणि कृषी क्षेत्रातील उपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आकाशवाणीचे योगदान उल्लेखनीय आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक मार्गदर्शन, महिला वर्गासाठी उपयुक्त कार्यक्रम, युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांना आपले विचार आणि कला सादर करण्याची संधी आकाशवाणीने उपलब्ध करून दिली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात माहिती पोहोचविणे, जनजागृती करणे आणि समाजाला मार्गदर्शन करणे यामध्येही आकाशवाणीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आकाशवाणी जळगावच्या माध्यमातून अनेक कलाकार, साहित्यिक, लोककलावंत, शेतकरी आणि नवोदित प्रतिभावंतांना आपली कला व विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे.बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही आकाशवाणीने आपली विश्वासार्हता आणि लोकाभिमुख कार्याची परंपरा कायम ठेवली आहे.वर्धापन दिनानिमित्त अभियांत्रिकी प्रमुख भारती नेमाडे,निवृत्त केंद्रप्रमुख सुधीर ओखदे,निवृत्त अकाउंटंट एन.एस कुलकर्णी ( नाना) ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, जळगांव, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर बोबडे,कार्यक्रम प्रमुख विजय भुयार आणि आकाशवाणी जळगाव केंद्रातील नैमित्तिक उद्घोषक यांच्या उपस्थितीत केक कापण्यात येऊन आनंद व्यक्त करण्यात आला. डॉ.एन.एस. चौधरी यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर घेण्यात आले.अनेकांनी शिबिराचा लाभ घेतला.


सध्या आकाशवाणी जळगाव येथे केंद्रप्रमुख तथा कार्यक्रम प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर बोबडे,कार्यक्रम अधिकारी विजय भुयार आणि वरिष्ठ उद्घोषक नरेंद्र ठाकूर कार्यरत आहेत.
आकाशवाणी जळगावच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व रसिक श्रोते, कलाकार, शेतकरी, हितचिंतक आणि नागरिकांनी शुभेच्छा दिल्यात.खानदेशच्या जनजीवनाशी जोडलेले हे माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाचे माध्यम भविष्यातही अधिक प्रभावीपणे कार्यरत राहो, हीच अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!