Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

कर्की सीमा तपासणी नाक्यावरील चोरटी वाहतूक रोखण्यासाठी शिवसेनेचे ठिय्या आंदोलन, पुन्हा आंदोलनाचा इशारा

मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके || मुक्ताईनगर सीमा तपासणी नाका चुकवून चोरट्या मार्गाने होणारी ओव्हरलोड वाहनांची वाहतूक रोखावी, तसेच शासनाच्या महसुलाचे होणारे नुकसान थांबवावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) कर्की सीमा तपासणी नाक्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. यावेळी चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर कारवाई करून संबंधित मार्गावर पोलीस व परिवहन विभागाची कायमस्वरूपी संयुक्त चौकी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.


शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी या समस्येकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी चौकशीसंदर्भात पत्र दिले होते. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी आंदोलनाबाबतचे पत्र संबंधित विभागाला देण्यात आले. मात्र, या प्रश्नावर ठोस उपाययोजना व्हावी, या मागणीसाठी १७ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कर्की फाटा, नायगाव फाटा, नायगाव गावाबाहेरील घंटा मारोती मंदिरासमोरून पुरणाड गावातून पुरणाड फाट्याकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करून काही वाहने सीमा तपासणी नाका चुकवून जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या मार्गावरून ओव्हरलोड वाहनांची वाहतूक होत असल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित मार्गावर २४ तास कार्यरत राहील अशी पोलीस आणि परिवहन विभागाची संयुक्त चौकी तातडीने उभारावी. तसेच ओव्हरलोड वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.

आरटीओ विभागाकडून लेखी पत्र…

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाकडून लेखी पत्र मिळाल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी दिली. कायमस्वरूपी चौकी उभारण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात येईल, असे या पत्रात नमूद असल्याचे त्यांनी सांगितले.


“कर्की सीमा तपासणी नाक्यावरून ओव्हरलोड वाहने चोरट्या मार्गाने जात असल्याने महाराष्ट्र शासनाच्या महसुलाचे नुकसान होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर कारवाई करावी, संबंधित मार्गावर कायमस्वरूपी चौकी उभारावी आणि ओव्हरलोड वाहनांना दंड आकारावा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. गैरप्रकारांना आळा बसून शासनाच्या महसुलात वाढ व्हावी, हा आंदोलनामागील उद्देश आहे. आरटीओ विभागाकडून लेखी पत्र मिळाले असून, चौकीसंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे त्यात नमूद आहे. या प्रकरणात चालढकल झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी दिला.

या आंदोलनात शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, नगरसेवक गणेश टोंगे, माजी नगरसेवक निलेश शिरसाठ, मोहन बेलदार, राजेंद्र वानखेडे, पंकज कोळी, दीपक वाघ, प्रफुल्ल पाटील, आप्पा वंजारी, रणजीत गोयंका, विनोद पाटील आणि नारायण पाटील यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आता या मागण्यांवर परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, तसेच संबंधित मार्गावरील चोरट्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी चौकी उभारण्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!