भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ई-पिकांच्या सर्व नोंदींची होणार आता पडताळणी, नवी नियमावली जारी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पीक पाहणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी महसूल विभागाने पाऊल उचलले आहे. नोंदीतून येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी आणि त्यातील चुका पुन्हा होऊ नये, यासाठी आता ई पीक पाहणीअंतर्गत करण्यात आलेल्या नोंदीची पडताळणी करण्यात येणार आहे. सर्व नोंदीची पडताळणी झाल्यावरच पुढील कार्यवाही होणार आहे. त्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली असून, डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्पांतर्गत आता पीक नोंदणी तपासली जाणार आहे.

दोन आठवड्यांला होणार आढावा – ई-पीक पाहणीच्या कामाचा आता दर दोन आठवड्यांनी आढावा घेतला जाणार आहे. खरीप-रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून त्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे. आढाव्यावेळी ज्यांचे काम कमी असेल त्यांच्या ठिकाणी विशेष मोहीम राबवून ते काम पूर्ण करून घेतले जाणार आहे. त्यासाठीची कार्यवाही खरीप हंगामापासून सुरू करण्यात येत आहे.

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे पीक पाहणी प्रक्रियेत शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना ई-पीक पाहणीबाबत तांत्रिक माहिती दिली जाणार आहे. त्याद्वारे ते आपल्या पालकांना अचूक नोंदणीसाठी मदत करू शकतील.

महसूल विभाग, कृषी विभाग आणि एनआयसी यांच्या समन्वयाने ही प्रक्रिया राबविली जात आहे. मोबाईल अॅपद्वारे केलेल्या नोंदींमध्ये काही त्रुटी किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास, ती त्वरित दुरुस्त करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरून सूचना दिल्या जाणार आहेत.

कसे आहेत नवीन बदल
प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पीक पाहणी सहायक

सहायकांच्या नोंदींची ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून तपासणी

शाळा, कॉलेज, कृषी विद्यापीठांतून ई-पीकची माहिती मिळणार

सहभागी करून घेतले जाणार या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनाही

चुका दुरुस्तीसाठी जिल्हा व तालुका मार्गदर्शन स्तरावरून

सर्व नोंदीची १०० टक्के तपासणी केली जाणार

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!