भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

मयतांच्या नावे रेशन धान्य उचल, साडेनऊ लाखांचा अपहार, दोन रेशन दुकानदारांवर गुन्हा दाखल

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मयत रेशनधारकांच्या नावे आलेले धान्य उचल करून तसेच मंजूर क्षमतेपेक्षा अधिक लाभार्थी दाखवून शासकीय धान्याचा तब्बल ९ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे उघडकीस आला. याप्रकरणी दहिवद, ता. अमळनेर येथील
रेशन दुकान चालक रमेश काशीनाथ पाटील आणि कोकीळाबाई वासुदेव माळी या दोन रेशन दुकानदारांविरुद्ध उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अमळनेर पोलिस ठाण्यात गुरुवार रोजी त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ व जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत पुरवत निरीक्षक
अधिकारी रुकसाना जमाल शेख यांच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, २०१२ ते २०१६ या कालावधीत अंत्योदय व बीपीएल योजनेतील लाभार्थ्यांच्या नावे मोठ्या प्रमाणात धान्य उचलण्यात आले. यात सुमनबाई मच्छींद्र पाटील, गुणवंताबाई आत्माराम माळी, सोनाबाई देवचंद माळी आदी मयत लाभार्थ्यांच्या नावे धान्य उचलल्याचे तपासात उघड झाले. तसेच मंजूर क्षमतेपेक्षा अधिक १३ लाभार्थी वाढवून त्यांच्या नावेही गहू व तांदूळ उचलण्यात आले. रमेश पाटील यांनी अंत्योदय योजनेतील ८५ हजार ३३४ रुपये किमतीचे २२४० किलो गहू-तांदूळ तसेच बीपीएल योजनेतील ३ लाख ६६ हजार ४१२ रुपये किमतीचे ९ हजार ६०० किलो धान्याचा अपहार केल्याचे समोर आले आहे.

कोकिळाबाई माळी यांनी मनकर्णाबाई दगडू शेटे या मयत असतानाही त्यांच्या नावे धान्य उचल केले. काहींना नियमानुसार धान्य वाटप न करणे असे आरोप आहे. त्यांनी अंत्योदय योजनेतील ७० हजार ६६७ रुपये किमतीचे १८५५ किलो धान्य तसेच बीपीएल योजनेतील ४ लाख ३९ हजार ९९६ रुपये किमतीचे ११ हजार ५२० किलो गहू-तांदळाचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत श्यामकांत जयवंतराव पाटील यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर संबंधित दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले होते. मात्र गुन्हे दाखल होत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!