Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

पेव्हर ब्लॉक कामावर निकृष्ट दर्जाचे साहित्य, पीसीसी कामात त्रुटी व निधीच्या गैरवापराचा आरोप, ठेकेदाराला नोटीस, चौकशी नंतरच बिलाचा निर्णय

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद येथील गणेश नगरातील पेव्हर ब्लॉक कामावर अनियमिततेचे आरोप करण्यात आले असून पेव्हर ब्लॉक कामावर निकृष्ट दर्जाचे साहित्य, पीसीसी कामातील त्रुटी व निधीच्या गैरवापराचा आरोप ही करण्यात आला आहे. या संदर्भात ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून उच्चस्तरीय चौकशी नंतरच बिलाचा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

देवेंद्र भंगाळे (रा. गणेश नगर, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, न्यू प्लॉट एरिया, नशिराबाद) यांनी नशिराबाद नगरपरिषदेकडे गणेश नगर परिसरात नुकत्याच करण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

भंगाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सदर कामासाठी सुमारे ₹9,96,936 इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी जीएसटी वजा करून ₹8,01,224 इतकी रक्कम संबंधित ठेकेदार शेख मोहसीन शेख सलीम खाटिक यांना अदा करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.तक्रारीत म्हटले आहे की, कामासाठी वापरण्यात आलेले पेव्हर ब्लॉक अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ब्लॉक बसविण्यापूर्वी करण्यात आलेले पीसीसी (PCC) बेसचे कामही नियमबाह्य व दर्जाहीन आहे. त्यामुळे नव्याने करण्यात आलेले काम अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात केवळ २२ मीटर रुंद व ३२ मीटर लांब इतक्याच क्षेत्रात काम करण्यात आले असून, या कामाचे बाजारभावानुसार अंदाजित मूल्य सुमारे ₹३.७५ लाख इतके असल्याचा दावा करण्यात आला आहे. मजूर निधीच्या तुलनेत मोठी आर्थिक तफावत असल्याने शासकीय निधीच्या अपहाराची शंका व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, काम सुरू असताना किंवा पूर्ण झाल्यानंतर नगरपरिषदेच्या कोणत्याही जबाबदार अधिकारी अथवा अभियंत्याने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली नसल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणी तक्रारदाराने निकृष्ट दर्जाच्या कामाचे छायाचित्रे तसेच पीडीएफ स्वरूपातील कागदपत्रे प्रशासनाकडे पुरावा म्हणून सादर केल्याचे सांगितले आहे.

तक्रारदाराच्या प्रमुख मागण्या :

• गणेश नगरातील पेव्हर ब्लॉक कामाची जळगाव जिल्हा बांधकाम विभाग तसेच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तांत्रिक पथकामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

• वापरण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकचे प्रयोगशाळेत (Lab Testing) गुणवत्ता परीक्षण करण्यात यावे.                            

• शासकीय निधीचा अपहार व जनतेची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा

दरम्यान, या संदर्भात नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, सदर कामाचे कोणतेही देयक अद्याप अदा करण्यात आलेले नाही. या कामाची त्रयस्थ शासकीय यंत्रणेमार्फत तांत्रिक तपासणी झाल्यानंतरच बिल मंजूर करण्यात येईल. तपासणीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!