Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

पुन्हा भाजपात येणार? विनोद तावडे यांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट, राजकीय वर्तुळात भाजप प्रवेशावर पुन्हा चर्चांना ऊत…खडसे यांनी स्पष्टपणे सांगितलं ……

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी |राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना अचानक उधाण आलं. त्यामुळे खडसे खरंच भाजपात जातात की नाही? हे पाहणं महत्त्वाचं होतं. भाजप नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात येण्याची ऑफर दिल्यानंतर या चर्चा सुरू झाल्यात. असे असताना खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. त्यामुळे कोणता निर्णय खडसे घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. या दरम्यान खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “भाजप नेते विनोद तावडे आणि आम्ही गेले अनेक वर्षे सोबत काम करत होतो. भाजपमध्ये विनोद तावडेंचे योगदान खूप आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना वाटत असावे की जुन्या लोकांनी पक्षात यावे. कर्नाटकचा पराभवावरून त्यांना असे वाटले असावे की जुन्या नेत्यांनी पक्षात परत यावे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यातील भेटीमुळे एकनाथ खडसे यांच्या पुन्हा भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. जळगाव व परिसरातील राजकीय वर्तुळात या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.खडसे यांची भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी जवळीक आणि त्यांनी दिलेले संकेत पाहता हा संभाव्य राजकीय बदल महत्त्वाचा मानला जात आहे. तथापि, याआधीही खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र काही स्थानिक कारणांमुळे तो प्रवेश लांबणीवर पडला होता

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!