खानदेशातून “खान्देश हिट्स” टीम च्या रूपात अंकुश चौधरी यांची ग्रामीण भागातून यशस्वी उंच झेप
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, प्रतिनिधी | श्री अंकुश राजेंद्र चौधरी. रा. चांगदेव. तालुका मुताईनगर. … आपणांस शिक्षण संस्था क्षेत्रातील आणि बाजार समिती बोदवड च्या संचालक रूपाने राजकारणातील सुपरिचित असे नांव. या सगळ्यात अजून एक अभिमानाची गोष्ट घडलीय. पुणे खराडी येथे ABC pro basketball season …4.संपन्न होत आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तून मातब्बर टीम येत आहेत. त्यामध्ये आपल्या संपूर्ण खानदेशातून खान्देश हिट्स ही टीम आपले श्री अंकुश भाऊ चौधरी यांनी घेतलीय. त्याची स्पॉन्सर शिप म्हणजे मालकी घेतलीय. आणि विशेष म्हणजे सगळे दिग्गज आणि मातब्बर जसे मुंबई टीम चे श्री सदानंद जी सुळे, अहिल्या नगरचे श्री रोहित पवार, मुंबई bears चे श्री शशांक गोयंका पुणे चे श्री इंद्रनील चितळे ही नामांकित मंडळी.
या सगळ्यांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील एवढ्या छोट्याशा चांगदेव या गावातून आणि ग्रामीण भागातून जाऊन एवढी उंच यशस्वी झेप घेणे विशेष नमूद करण्यासारखे आहे. एवढ्या मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या टीम्स मध्ये असलेला अंकुश भाऊ यांचा सहज पणाने असलेला वावर त्यांचा आत्मविश्वास दर्शवितो.सोबत उद्घाटन प्रसंगी आपल्या खासदार माननीय श्रीमती रक्षा ताई खडसे क्रीडा व युवक कल्याण मंत्री उपस्थित आहेत. आपणांस टीम च्या विजयासाठी हार्दिक शुभेच्छा…. आणि आपले हार्दिक अभिनंदन.
