भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

चिनावल शिवारात सुमारे ३५०० केळीची खोडे कापून उध्वस्त

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | कोण्या अज्ञात व्यक्तींनी रावेर तालुक्यातील चिनावल येथे जुना सावदा रस्त्यालगत असलेल्या शेतकरी खेमा कामा पाटील यांच्या शेतातील सुमारे ३५०० केळीची खोडे कापून उद्ध्वस्त करून टाकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

रावेर तालुक्यातील चिनावल येथील शेतकरी खेमा कामा पाटील यांच्या चिनावल सावदा जुन्या रोडवर असलेल्या शेतातील सुमारे ३५०० केळीची नवती ची खोडे कोण्या अज्ञात व्यक्तींनी एका रात्रीत उद्ध्वस्त करण्यात आली. यामुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेने शेतकरी खेमा पाटील यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरचे केळीचे नुकसान कोणी केले याचा तपास सावदा पोलिस घेत आहेत.

आशा शेतीचे नुकसान करणाऱ्या घटना चिनावल परिसरात नेहमीच घडत असतात. या अशा घटनांना कायमचा पायबंद घालावा अशी मागणी परसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!