श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
खामगाव,जिल्हा – बुलढाणा. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सदगुरू शिष्य म्हणजे गुरुपौर्णिमा शिष्य गुरू पोर्णिमेच्या दिवशी गुरु पुजन करून आत्मनंदाची अनुभुती करून घेतात सदगुरू ज्ञान हे शिष्याच्या जीवनातील प्रकाश ज्योत आहे स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने मागील २५ वर्षा पासून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम अखंड निस्वार्थ पणे मुख मे हो राम नाम. राम सेवा हाथ मे हे ध्येय घेऊन अखंडपणे सुरू आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा गुरू पोर्णिमा निमित्त दिं ३-७-२०२५ गुरूवार ते दिं १०-७-२०२५ गुरूवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या एकनिष्ठ सदस्या स्व. प्रमिला बाई देशमुख यांच्या घरी करण्यात आले होते या मध्ये दररोज सकाळी ९ ते १ श्रीमती सुशिलाबाई आवलकर व्यास पीठ चालक यांच्या अमृत वाणीतून सामुहिक ज्ञानेश्वरी पारायण .दुपारी ५ ते ६ हरिपाठ.रात्री ८ ते ९-३० सदगुरू स्त्रोत्र सामुहिक पारायण, सामुहिक जप माळ, नामस्मरण,भजन तसेच दिं ९ जुलै रोजी दुपारी २ ते ४ ह, भ, प, मुरलीधर महाराज हेलगे यांच्या अमृतवाणीतुन ज्ञानेश्वरी भाव चिंतन ६ ते ८ दीपोत्सव दिं १०-७-२०२५ गुरूवार रोजी सकाळी १० ते ११ सदगुरू स्तोत्र पारायण ,११ते १२ नामस्मरण, १२ वा महाआरती करून गुरू पोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.दुपारी १२ -३० वा दही हंडी फोडून प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
य
ाप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा,विनोद सुकाळे,अरूण कडवकर,दिलीप झापर्डे, लालाजी सांगळे,
बंटी देशमुख,विनोद देशमुख, विक्की देशमुख,सुशिला आवलकर.भागीरथी शेळके. पार्वतीबाई सुकाळे, आशाबाई अंधारे, संगिता वाघोळे, वर्षा देशमुख, निता अंधारे. मंगला बावस्कर, बेबी आवलकर,पुष्पा पवार.नंदा देशमुख. वंदना शेळके.शालीनी देशमुख,पुष्पा सरोदे.शालिनी देशमुख. मिना शिंदे.गायत्री देशमुख व भजनी मंडळाचे सर्व सदस्य व परीसरातील नागरीकांची उपस्थिती होती मागिल २५ वर्षी पासुन मंडळाच्या वतीने १२ ही महीने अन्नदान, गोरगरिबांना थंडीच्या दिवसात ब्लँकेट वाटप, दिवाळी ला मिठाई व नमकीन वाटप, वृक्षारोपण, रक्तदान, असे अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले जात आहे. अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे वतीने देण्यात आली.
