भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

१२ लाखांची मागणी, ६ लाख घेताना मुख्याधिकाऱ्याला रंगेहात अटक

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र शासनाच्या नगर उत्थान अभियान योजने अंतर्गत, नगरपरिषद माजलगाव जिल्हा बीड येथे केलेल्या सिमेंट रस्त्याचे कामाचे बिल दोन करोड काढल्याच्या मोबदल्यात ३ % असे ६ लाख रुपये व राहिलेल्या उर्वरित कामांमधील रस्त्याचे बाजूचे अतिक्रमण काढून, अडथळे दूर करून देण्यासाठी ६ लाख असे एकूण १२ लाख रुपये लाचेची मागणी मुख्याधिकारी चंद्रकांत इंद्रजीत चव्हाण वय ३५ वर्षे. यांचे कडून करण्यात आली. त्या नंतर तडजोड करत ६ लाखांची लाच स्वीकारताना मुख्याधिकारी चव्हाण यांना त्यांच्या राहत्या घरीच छत्रपती संभाजीनगर च्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवार दिनांक १० जुलै रोजी रंगेहात अटक केली.

महाराष्ट्र शासनाच्या नगर उत्थान अभियान योजने अंतर्गत, नगरपरिषद माजलगावातील केलेल्या सिमेंट रस्त्याचे कामाचे बिल दोन करोड काढल्याच्या मोबदल्यात ३ % असे ६ लाख रुपये व राहिलेल्या उर्वरित कामांमधील रस्त्याचे बाजूचे अतिक्रमण काढून, अडथळे दूर करून देण्यासाठी ६ लाख असे एकूण १२ लाख रुपये लाचेची मागणी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी केली होती. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर एसीबी कडे लेखी तक्रार करण्यात आली होती.

सदर तक्रारीची पडताळणी करून सापडा रचण्यात आला. गुरुवार रात्री माजलगाव शहरातील पिताजी नगर येथील भाड्याच्या घरात चव्हाण यांनी ६ लाख रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर एसीबी प्रमुख केशव दिंडें यांचे सह त्यांच्या टीमने चव्हाण यांना रंगेहात पकडून अटक केली. एसीबी कडून त्यांच्या घरची झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

या संदर्भात चंद्रकांत इंद्रजीत चव्हाण, वय ३५ वर्ष ,पद. मुख्याधिकारी (वर्ग २) नेमणूक नगरपरिषद, माजलगाव जि.बीड, रा. पिताजी नगरी,माजलगाव जि.बीड. याना अटक करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. या कारवाईने माजलगाव शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.

सदरची कारवाई श्रीमती, माधुरी केदार/कांगणे मॅडम, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर. श्री. सुरेश नाईकनवरे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक तथा पो. उप अधिक्षक. ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्री. केशव दिंडे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजीनगर. पोह/अशोक नागरगोजे, राजेंद्र सिनकर, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर. यांनी केली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!