भुसावळ मध्ये बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यासह भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी हसणेन शेख कुब्बद्दीन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला हजर करण्यात आले असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४४/२०२६ अंतर्गत बलात्कार व पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. तसेच भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०६/२०२६ अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांशी संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, पोलीस कर्मचारी राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रशांत सोनार आणि अशोक बाविस्कर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, संबंधित प्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू असून, दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने पुढील तपास केला जात आहे.


