भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

वराडसिम येथे विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || भुसावळ येथून जवळच असलेल्या वराडसिम गावाच्या विविध विकासकामांसाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून समस्त वराडसिम ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.


गावाचा विकास, स्वच्छता, सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:
१. स्पर्धा परीक्षा अभ्यासिका: गावातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका तयार करणे.
२. शाळा व शौचालय दुरुस्ती: जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेची इमारत आणि शौचालयांची तातडीने दुरुस्ती करणे.
३. नालेसफाई: गावातील नाले व गटारींची तातडीने सफाई करणे.
४. सुरक्षा व्यवस्था: सुरक्षेच्या दृष्टीने गावात विविध ठिकाणी CCTV कॅमेरे बसवणे.
५. दिव्यांग निधी: दिव्यांग व्यक्तींचा हक्काचा निधी तातडीने वितरित करणे.
६. नवीन गटारी: अति आवश्यक ठिकाणी तातडीने नवीन गटारी तयार करणे.
७. कचरा कुंड्या: गावात आवश्यक ठिकाणी कचरा कुंड्या बसवणे.


ग्रामस्थांचा इशारा:
“गावाच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी सर्व ग्रामस्थ एकवटले आहेत. जोपर्यंत प्रशासनाकडून आमच्या या रास्त मागण्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष काम सुरू होत नाही, तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच राहील,” असा पवित्रा समस्त वराडसिम ग्रामस्थांनी घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!