लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू नवऱ्याची नजर चुकवून दागिन्यांसह फरार
औरंगाबाद,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सध्या लग्न जमणं फार कठीण, नवऱ्या मुलाला मुलगी मिळणं खूपच अवघड झालं आहे, तरुण कुठलीही कोणत्याही समाजाच्या मुलीशी लग्न करायला तयार असतात तेही हुंडा न घेता उलट नवरी मुली च्या नातेवाईकांना दलालांन मार्फत लाखोंरुपये नवऱ्या मुलांकडून दिले जातात.आशीच एक घटना खुलताबाद तालुक्यात घडली. तीन दिवसांपूर्वी लग्न झाले. सासरच्या मंडळी सह नवरा-बायको आंनदी होते.लग्न झालेवर फिरायला जण्याची प्रथा आहे. लग्नानंतर नवरा आणि बायको २९ मार्च रोजी फिरायला म्हणून दौलताबाद किल्ल्यावर गेले. एवढ्यात ” ती ” नवऱ्याची नजर चुकवून नववधू तेथून पसार झाली. नुकतेच लग्न झालेले असल्याने ७० हजार रुपये किंमतीचे सर्वच दागिने या पत्नीच्या अंगावर होते. या दागिन्यांसह तिने दौलताबाद परिसरातून कारमधून धूम ठोकली. लग्न जुळवण्या पासून पारपडे पर्यंत मोठा खर्च करावा लागल्याने पती व सासरच्या मंडळीला मोठा धक्का बसला.
याबाबत अधिक माहिती अशी की,दौलताबाद जवळील खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथे राहणारा वाळूज येथे एका कंपनीत काम करीत असलेला राजेश प्रकाश लाटे हा तरुण लग्नासाठी वधूच्या शोधात होता. काही दिवसांपूर्वी त्याची जळगाव जिल्ह्यातील बबन म्हस्के याच्याशी ओळख झाली. या मध्यस्थाच्या ओळखीतून एक मुलगी लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर बबन म्हस्के याने त्याची ओळख अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील नवरी मुलीची मावशी आशाबाई भोरे यांच्याशी करून दिली. या दोघांच्या मध्यस्थीने जळगाव जिल्ह्यातील प्रभाकर शिंदे यांची मुलगी शुभांगीसोबत राजेश लाटे याचा विवाह ठरला. यासाठी त्याला मुलीच्या नातेवाईकांना १ लाख ३० हजार रुपये द्यावे लागले. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर शुभांगीशी २६ मार्च २०२२ रोजी राजेशने दौलताबाद येथील दत्तमंदिरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न विधी पार पाडला.
चांगली मुलगी मिळाल्याने सर्व सासरची मंडळी खुश होती.राजेशने शुभांगीच्या अंगावर ७० हजार रुपये किंमतीचे दागिने घातले होते. तसेच लग्नाचा संपूर्ण खर्चही केला होता. २७ मार्च रोजी हे जोडपे देवदर्शन करून आले. त्यानंतर २९ मार्च रोजी सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर हे दोघे देवगिरी किल्ला पाहण्यासाठी गेले असता तुम्ही किल्ल्यात जाण्यासाठी तिकिटे काढा, मी काही खाण्याचे पदार्थ आणते, असे नवरीने सांगितले. बराच वेळ झाला शुभांगी परत येत नसल्याने राजेश मुख्य रस्त्याकडे आला. तेथील दुकानदारांना विचारपूस केली असता ती एका बोलेरो गाडीत बसून गेल्याचे काही जणांनी सांगितले. या घटनेने राजेश व त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला ,या बाबत राजेशने दौलताबाद पोलिस स्टेशनला ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास सुरू आहे.