भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळरावेर

हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ, आठ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले

भुसावळ/रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. पूर्णा नदीतून आलेला जलसाठा हतनूरमध्ये पोहोचल्याने, धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हतनूर धरणाचे ४६ पैकी ८ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.सध्या च्या या वेळेला तापी नदीत १० हजार क्युसेक्स प्रति सेकंद या गतीने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती हतनूर प्रशासनाकडून देण्यात आली.

यंदाच्या पहिल्यांदाच हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग लवकर सुरू झाल्याने तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेश,  विदर्भ आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. तापी आणि पुर्णा नद्यांच्या उगमक्षेत्रावर पाऊस सुरूच असल्याने त्या मुळे पूर्णा नदीला पूर येऊन, तिचे पाणी थेट हतनूर धरणात जमा होत आहे. पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने धरणाच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ८  दरवाजे उघडले आहेत.

हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने पाणी विसर्ग केला जात असून त्या मुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना आणि शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसेच जनावरे चराईसाठी नदीकाठी सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अचानक पाणी पातळी वाढल्यास जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. सद्यस्थितीत पाण्याचा विसर्ग नियंत्रित स्वरूपात सुरू असला तरी, पुढील काळात हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास अधिक दरवाजे उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!