भुसावल तालुक्यात फॅक्टरीत स्फोट ; दोन कामगार जागीच ठार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
भुसावळ,मंडे टू मंडे वृत्तसंकलन। भुसावल तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील एका फॅक्टरीत वेल्डींग करताना अचानक झालेल्या स्फोटात दोन कामगार जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडलीय. या स्फोटात काशिनाथ सुरवाडे (रा. खेडी रोड जळगाव) आणि खेमसिंग पटेल रा. बेमतेरा. छत्तीसगड या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसर हादरला आहे.
याबाबत असे की, दिया कॉपर मास्टर अलायन्स कंपनी ही भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर आहे. शुक्रवारी २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील ऑईल टाकीला दोन कर्मचारी वेल्डिंग करण्याचे काम करत होते. वेल्डिंग करतांना अचानक शार्टसर्किमुळे मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत काशिनाथ सुरवाडे आणि खेमसिंग पटेल यांचा मृत्यू झाला . झालेल्या घटनेत स्फोटात मोठा आवाज झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. परिसरातील नागरीकांना धाव घेतली होती. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलीस ठाण्याचे सपोनि प्रकाश वानखेडे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेतली आहे. मयत झालेले कर्मचाऱ्यांची अधिक माहिती घेतली जात आहे.