भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ पुन्हा खुनाने हादरले : महिलेची निर्घृण हत्या !

भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील आज एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाल्याची खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ शहर पुन्हा खुनाने हादरले आहे.

शहरातील सुचित शुभम बारसे (32, रा.कवाडे नगर, भुसावळ) असे मयत महिलेचे नाव आहे. 32 वर्षीय विवाहितेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपीने महिलेच्या छातीवर चाकूचे अनेक वार करून तिचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. वर्दळीच्या आरपीडी रस्त्यावर पोलिस चौकी क्रमांक सात असून या चौकीच्या मागे असलेल्या निर्जनजागी ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. पहाटेच्या सुमारास एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याचे आढळून आल्यानंतर या संदर्भात पोलीस स्थानकात माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली. या महिलेची अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

तिच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे दिसून येत असून शारीरीक अत्याचार केल्यानंतर तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.महिलेचा खून झाल्याची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी, बाजारपेठचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भुसावळ ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. दरम्यान, या संदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या पार्श्‍वभूमिवर शहरात पुन्हा एकदा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!