भुसावळातील आनंद लॉजवर छापा; पाच महिलांसह ग्राहक ताब्यात
भुसावळ, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : शहरातील पांडूरंग टॉकीजजवळील आनंद लॉजवर चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडा फोड करत वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांसह ग्राहकांना भुसावळ पोलीसांनी छापा टाकून ताब्यात घेतले असून छाप्यातील कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना शहरातील पांडूरंग टॉकीजजवळील आनंद लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने आज सोमवारी २१ मार्च रोजी भुसावळ पोलीसाच्या पथकाने आनंद लॉज येथे अचानक छापा टाकला असता यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिला आणि पाच आंबटशौकीनांना ताब्यात घेतले असून तसेच बेकायदेशीर व अनैतीक व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह मालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. सदरील कारवाईने भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.