भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

सोने खरेदीदारांना मोठा फटका, ऐन दिवाळीत सोन्याच्या दराने विक्रम गाठला

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज दिवाळी साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. सोने खरेदीदार या मुहूर्तावर सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात.

मात्र सोन्यापाठोपाठ चांदीने विक्रमी पातळी गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले असून मोठा फटका बसत आहे.आज सोने दरात मोठी वाढ झाल्याने नवीन किंमती पाहून सोने खरेदीदारांना घाम फुटला आहे.

आज मंगळवारी १ तोळा सोन्याचे दर २०२८० रुपयांनी महागले आहे. ज्यामुळे आता २४ कॅरेट १० ग्रॅम सोने खरेदीसाठी तुम्हाला १,३२,७७० रुपये मोजावे लागणार आहे. त्याच बरोबर २२ कॅरेट सोने देखील आज १९०० रुपयांनी वाढून ते १,२१,७०० रुपयांवर पोहोचले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!